महिलेने चोरल्या नऊ जीन्स, व्हिडीओ व्हायरल

1792

मॉलमध्ये , शॉपिंग सेंटरमध्ये भामटे कपडे, घड्याळ, मोबाईल याबरोबरच अनेक छोट्या मोठ्या वस्तूंची चोरी करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहीले असतील त्याबद्दलच्या बातम्याही वाचल्या असतील. या भामट्यांच्या यादीत आता व्हेनेझुएलाच्या एका महिला चोराच्या नावाचाही समावेश झाला आहे. या चोरटीने एका मॉलमधून एक नाही दोन नाही तीन नाही तर चक्क नऊ डेनिम जीन्स चोरल्या.

त्या जीन्स घालून ती मॉलभर फिरली. आपल्याला कोणी पकडू शकणार नाही असा तिला विश्वास होता. पण नेमका तेथेच घोळ झाला आणि एका सुरक्षा रक्षकाने तिला अडवले. महिला संशयित रित्या मॉलमध्ये फिरत असल्याने सुरक्षा रक्षकाने तिला त्याचे कारण विचारले. यावर आरोपी महिलेने त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे सुरक्षा रक्षकाला संशय आला. त्याने याबद्दल मॉल मॅनेजरला सांगितले. त्यानंतर भामट्या महिलेची तपासणी करण्यात आली. यावेळी तिने एकापाठोपाठ एक अशा नऊ जीन्स घातल्याचे सीसीटीव्हीत दिसले. हे बघून मॉल कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. या व्हिडीओला 45 लाख व्यूज मिळाले असून हजारो लोकांनी त्याला लाईक्स केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या