महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाण्यात सभा घेणार आहेत. पण ज्या लाडक्या बहिणींसाठी हा कार्यक्रम होत आहे त्याच लाडक्या बहिणींचे हाल होत आहेत. भर उन्हात लाडक्या बहिणी पंतप्रधान मोदींच्या सभामंडपाच्या ठिकाणी पोहोचत आहेत.
नवरात्र सुरू असल्याने अनेक माता भगिनींचे उपवास सुरू आहेत. अनेक माता भगिनी या काळात पायात चप्पल घालत नाहीत. त्यामुळे भर उन्हात या माता भगिनी अनवाणीच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. या महिलांनी तब्बल दीड किलोमीटर पायपीट केली आहे. त्यामुळे अनेक महिलांनी संताप व्यक्त केला आहे.