फायनलपूर्वी तेंडुलकरची हिंदुस्थानी खेळाडूंना गोलंदाजी

35

सामना ऑनलाईन । लंडन

रविवारी होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी हिंदुस्थानच्या खेळाडूंनी आज (शनिवारी) नेटमध्ये चांगलाच सराव केला. सरावादरम्यान प्रेक्षकांना एक खास दृश्य पाहायला मिळाले. ज्युनिअर तेंडुलकरच्या गोलंदाजीवर हिंदुस्थानच्या रणरागिणी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसून आल्या. अर्जुन तेंडुलकर हिंदुस्थानच्या खेळाडूंना गोलंदाजी करत होता. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पत्रकार मिलिंडा फॅरेलने आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन हिंदुस्थानची फटकेबाज फलंदाज वेदा कृष्णमूर्ती हिला गोलंदाजी करताना दिसत आहे. या ट्वीट सोबत मिलिंडाने ‘हिंदुस्थानच्या महिला खेळाडूंना गोलंदाजी करत आहे सचिनचा मुलगा अर्जुन आणि तो वेदाला गोलंदाजी करत आहे’, असे कॅप्शन टाकले आहे. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

उन्हाळ्याच्या सुटीसाठी सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासह सध्या इंग्लंडमध्ये आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान सचिन आणि त्याचे कुटुंब इंग्लंडमध्ये आले. डावखुरा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून अंडर १४ आणि अंडर १६ संघामध्ये खेळला आहे. तसेच अर्जुन पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसिम अकरमकडून गोलंदाजीचा सल्लाही घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या