महिलांवर हल्ला करणाऱ्या माथेफिरुची नागपुरात दहशत

सामना ऑनलाईन,नागपूर

दक्षिण नागपुरात मुली आणि महिलांवर हल्ला करून पळून जाणाऱ्या माथेफिरूची दहशत पसरली आहे. या माथेफिरुने भगवान नगरात एका महिलेवर हल्ला केला आणि त्यानंतर या माथेफिरूबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या माथेफिरूच्या दहशतीमुळे महिला,तरीणी संध्याकाळनंतर घराबाहेर पडणं टाळायला लागल्या आहेत.

दक्षिण नागपुरातील भगवान नगर परिसरात रविवारी दुपारी रेखा नामदेवराव पवार रस्त्याने घरी जात असताना तिच्यावर हेल्मेट घालून आलेल्या मोटारसायकलस्वाराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला मोठय़ाने किंचाळल्याने तो पसार झाला. सुदैवाने महिलेला किरकोळ मार लागला आणि ती थोडक्यात बचावली.

अजूनही हा माथेफिरू पोलिसांच्या हाती लागला नाहीये, गेल्या काही दिवसात या माथेफिरूने अजनी, हूडकेशवर, नंदनवन आणि सक्करदरात या भागात मोटारसायकलवर येऊन चाकूने महिला आणि तरुणीवर हल्ला केला. या माथेफिरूचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.