आता मुंबईत रंगणार महिलांची फुटबॉल लीग

25

सामना ऑनलाईन, मुंबई
युवासेना प्रमुख, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत फुटबॉलला सुवर्णझळाळी मिळाली असून आता या मुंबापुरीत मुलांसोबत महिलाही फुटबॉल खेळताना दिसणार आहेत. मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आणि मुंबई सिटी एफसीच्या सहकार्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महिलांची लीग खेळवण्यात येणार आहे. फर्स्ट डिव्हिजनमध्ये १६ संघांचा सहभाग असून यामध्ये दोन गटांमध्ये प्रत्येकी आठ संघ सहभागी होतील. या वर्षापासून सेंकड डिव्हिजनसाठीही लढती होणार आहेत. ही स्पर्धा ‘सेव्हन ए साइट’ फॉरमॅटमध्ये होईल. यामध्ये खेळण्यास इच्छुक असलेल्यांनी अधिक माहितीसाठी (०२२-२४१२४९००/९८९२६९९०९९) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

आपली प्रतिक्रिया द्या