हिंदुस्थानी महिलांची उपांत्य फेरीत धडक, जागतिक हॉकी लीग

9

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सलामीच्या लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये उरुग्वेला पराभूत केल्यानंतर आता सोमवारी झालेल्या लढतीत हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने बेलारुसला १-0 अशा फरकाने हरवण्याची करामत करून दाखवली. या दिमाखदार विजयामुळे हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाला जागतिक हॉकी लीग राऊंड टूच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करता आला.
हिंदुस्थाच्या वंदना कटारियाने २६व्या मिनिटाला बॅक हॅण्डने जबरदस्त गोल करीत आघाडी मिळवून दिली. ही आघाडी हिंदुस्थानने कायम ठेवत पुढे बेलारुसला पराभवाच्या खाईत फेकून दिले. या विजयामुळे हिंदुस्थानी संघाला अ गटामध्ये अव्वल स्थानावर झेप घेता आलीय. त्याचमुळे हिंदुस्थानी संघाला उपांत्य फेरीतही वाटचाल करता आलीय.

आपली प्रतिक्रिया द्या