2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत T-20 क्रिकेटचाही समावेश, वाचा सविस्तर

586

सामना ऑनलाईन,बर्मिंगहॅम

इंग्लंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी काही खेळांचा समावेश करण्यात आला आहे. या खेळांमध्ये क्रिकेटचाही समावेश झाला असून यातील T-20 प्रकार या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. तीन नव्या खेळांचा समावेश झाल्याने पदकांचीही संख्या वाढणा आहे. यापूर्वी 1998 साली क्रिकेटचा राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने क्रिकेटमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं.

राष्ट्रकुल स्पर्धेत T-20 क्रिकेट स्पर्धा ही फक्त महिलांसाठीच असणार आहे. पुरुषांसाठी मात्र या क्रीडाप्रकार समाविष्ट करण्यात आलेला नाहीये. क्रिकेटव्यतिरिक्त व्हॉलीबॉलचाही राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.

मंगळवारी राष्ट्रकुल स्पर्धा संघटनेची बैठक पार पडली. राष्ट्रकुल स्पर्धेत नव्या खेळांचा समावेश करण्याबाबत या बैठकीत ठराव मांडण्यात आला. हा ठराव मान्य करण्यात आल्याने महिलांसाठी T-20 क्रिकेट, व्हॉली बॉल आणि दिव्यांगासाठीच्या एका क्रीडाप्रकाराचा समावेश आहे. 2022 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून, सगळे सामने एजबॅस्टन क्रिकेट मैदानात रंगणार आहेत. 27 जुलैपासून स्पर्धा सुरू होणार असून ती 7 ऑगस्टपर्यंत चालेल.

आपली प्रतिक्रिया द्या