हिंदुस्थानची विजयी सलामीची हॅटट्रिक; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का

411
SYDNEY, AUSTRALIA - FEBRUARY 21: Poonam Yadav of India celebrates after taking the wicket of Ellyse Perry of Australia during the ICC Women's T20 Cricket World Cup match between Australia and India at Sydney Showground Stadium on February 21, 2020 in Sydney, Australia. (Photo by Ryan Pierse/Getty Images)

महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात हिंदुस्थानने सलग तिसऱयांदा विजयी सलामी देण्याचा पराक्रम केला. यावेळी तर चक्क सर्वाधिक चार वेळा जगज्जेते बनलेल्या अन् गत चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियालाच 17 धावांनी पराभवाचा धक्का देत हिंदुस्थानी महिलांनी दणक्यात स्पर्धेची सुरुवात केली. 132 या असुरक्षित धावसंख्येचा यशस्वी बचाव करताना फिरकीपटू पूनम यादव आणि मध्यमगती गोलंदाज शिखा पांडे यांनी अफलातून गोलंदाजी केली. सर्वाधिक 4 बळी टिपणारी पूनम यादव या सामन्याची मानकरी ठरली.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 133 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 19.5 षटकांत 115 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून अलिसा हिलीने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली, तर मधल्या फळीतील ऍशलेग गार्डनर (34) ही दुहेरी धावा करणारी आणखी एक फलंदाज ठरली. इतर फलंदाज केवळ हजेरीवीर ठरल्याने विद्यमान चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला सलामीलाच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. हिंदुस्थानने 2018 सालच्या विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या लढतीत न्यूझीलंडचा 34 धावांनी धुव्वा उडवला होता, तर 2016 साली बांगलादेशला 72 धावांनी हरवून विजयी सलामी दिली होती. त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 4 बाद 132 धावसंख्या उभारली.

पूनम-शिखाचा धमाका

अलिसा हिलीने 35 चेंडूंत 6 चौकार व एका षटकारासह अर्धशतकी खेळी केली, पण तिला दुसऱया बाजूने साथ मिळाली नाही. शिखा पांडेने बेथ मूनीला (6) राजेश्वरीकरवी झेलबाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. तिच्या जागेवर आलेली कर्णधार मेग लॅनिंग (5) हिला राजेश्वरी गायकवाडने यष्टीमागे तानिया भाटियाकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला मोठे यश मिळवून दिले. मग पूनम यादवने अलिसाला स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद करून कांगारूंना तिसरा धक्का दिला.

आपली प्रतिक्रिया द्या