खुशखबर! ख्रिसमसच्या दिवशी ‘हा’ चित्रपट थिएटरमध्ये झळकणार

सध्या कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे थांबलेली चित्रपटसृष्टी पुन्हा मार्गावर येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनलॉकमध्ये चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी मिळालेली असताना आता चित्रपटगृहात कोणते चित्रपट झळकणार याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागली आहे.

चित्रपटांवर कोरोनाचा परिणाम

या उत्सुकतेला कारणही तसंच आहे. बहुतांश मोठे चित्रपट हे कोरोनामुळे पुढच्या वर्षी प्रदर्शित केले जाणार आहेत. यातल्या काही चित्रपटांच्या निर्मितीचं काम बाकी आहे, तर काहींनी प्रतिसादाविषयी साशंक असल्याने पुढील वर्षाची निवड केली आहे. त्यामुळे आता नेमके कोणते चित्रपट चित्रपटात झळकतात त्याची उत्सुकता ताणली गेली आहे.

wonder-woman

कोणता चित्रपट प्रदर्शित होणार

या उत्सुकतेला शमवणारी बातमी आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने एक चित्रपट थिएटर्समध्ये झळकणार आहे. मात्र हा चित्रपट बॉलिवूडचा नसून हॉलिवूडचा आहे. बहुप्रतिक्षित वंडरवूमन 1984 हा चित्रपट ख्रिसमसच्या आसपास प्रदर्शित होणार आहे. जागतिक स्तरावर तो 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल. आणि हिंदुस्थानात तो ख्रिसमसच्या निमित्ताने झळकेल.

हिंदुस्थानात झळकणार पण…

मात्र, हिंदुस्थानात तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर म्हणजेच एचबीओ मॅक्सवर झळकणार आहे. एचबीओ मॅक्सवर तो प्रदर्शित झाल्यानंतर एक महिन्यापर्यंत विनामूल्य पाहता येईल. मात्र, त्यानंतर त्याची किंमत मोजावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या