लोकर इन फॅशन

95

श्रेया मनीष

यंदा हिवाळय़ाने जरा उशिराच आपली हजेरी लावली आहे आणि तीही अशी की कडाक्याच्या थंडीने सगळेच गारठून गेलेत…

थंडीपासून बचावण्यासाठी कपाटात कुठेतरी एकटे पडलेले स्वेटर, शाली, जॅकेट, कोट, ब्लँकेट सगळेच बाहेर पडू लागले आहेत. आता फॅशनपसंत लोकांना तर हाच प्रश्न पडला असेल की, या लोकरीच्या कपडय़ांमध्ये किंवा शाली, स्वेटरमध्ये त्यांची फॅशन कुठेतरी लपून जाईल. पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगत आहोत त्यामुळे थंडीतही तुम्ही फॅशनेबल दिसू शकता.

जॅकेट्स : अलीकडे बाजारात अनेक वेगवेगळय़ा डिझाइन आणि व्हरायटीचे जॅकेट्स मिळू लागले आहेत. काही जॅकेट्स वूलन नसले तरी ते आतून चांगलाच ऊबदारपणा येतो. ते तुम्हाला नॉर्मल लेंथ, नी लेंथ, अँकल लेंथ इत्यादी पॅटर्नमध्ये मिळू शकतात. तुम्ही जर सकाळच्या वेळेस घरातून बाहेर पडत असाल तर तुम्हाला अँकन लेंथ आणि नी लेंथचे जॅकेट्स तर फारच सुपर दिसतील. यामध्येही बाजारात फरवाले जॅकेट्सही मिळतात. जे घालून तुम्हाला केवळ ऊबदारपणाच नाही तर एक एलिगेंट लुकही मिळेल.

ब्लेझर : ब्लेझर बऱयाचदा जाडसर आणि हूडी. अलीकडे मुलींमध्ये आणि तरुण-तरुणींमध्ये हुडीचं चलन खूपच वाढलं आहे. फॅशनमध्ये इन असलेली हूडी तुम्हाला एक गॉर्जियस लूक देते. याला ऍटॅच असलेली कॅप तुमच्या डोक्याचं आणि कानाचं थंड वाऱयापासून संरक्षण करते.

स्वेटर : पूर्वापारपासून चालत आलेल्या लोकरीच्या स्वेटर्सचंही आता रूप बदललं आहे. पूर्वी केवळ डबल कपडय़ाने शिवलेले असतात. आता तर बाजारात वुलन ब्लेझरही मिळू लागलेत. तुम्ही ब्लेझर घालून केवळ ऊबदारपणाच मिळवणार नाही तर आपल्या लुकमध्ये एक रुबाबदारपणाही आणू शकाल. तुम्ही जर हा विचार करत असाल की फक्त एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभातच ब्लेझर घालायचं तर तो विचार सोडून द्या. दैनंदिन वापरात ब्लेझर घालून तुमचा रुबाब आणखीन वाढेल.

शर्टाच्या पॅटर्नमध्ये मिळणारे लोकरीचे स्वेटर आता वेगवेगळय़ा पॅटर्नमध्ये मिळू लागलेत. जसं की जीन्सवरील लोकरीचा फॅशनेबल टॉप, टी-शर्ट, ब्लेझर, लोकरीचा जॅकेट, फ्रॉक, ब्लाऊज इत्यादी. या वेगवेगळय़ा पॅटर्नचे स्वेटर घालून तुम्ही ऊबदारपणा बरोबरच एक गॉर्जियस लुक मिळवू शकता.

शॉल : थंडीपासून वाचण्यासाठी शॉल गुंडाळून तुम्ही काकूबाई दिसाल असं कोण म्हणत? अहो, आजीकडे सुंदरसुंदर डिझाइनच्या आणि पॅटर्नमध्ये मिळणाऱया शॉली तुम्ही केवळ ऊबदारपणा मिळावा म्हणून गुंडाळू नका, तर एका फॅशनेबल पद्धतीने गुंडाळा. यासाठी तुम्ही टीव्ही अगर वर्तमानपत्र या मासिकांमधील मॉडल्सने शॉल घातलेले पोझ बघा आणि त्यानुसार शॉल गुंडाळा. आहे की नाही गंमत… तुम्हीदेखील त्यांच्याप्रमाणे शॉल गुंडाळून फॅशनेबल मॉडल्सचं लुक मिळवू शकता.

टोपी-स्कार्फ : डोक्याला आणि कानाला थंड वारा लागल्यामुळे सर्दी होण्यापासून वाचवण्यासाठी स्कार्फ आणि टोपी खूप महत्त्वाचे असतात. आता वेगवेगळय़ा डिझाइन्स आणि पॅटर्नमध्ये मिळणाऱया टोपी आणि स्कार्फ घालून तुम्ही एक फॅब्युलस लुक मिळवू शकता. हातमोजे/ पायमोजे – गारठय़ापासून अंग आणि डोकं वाचवण्याचा तर तुम्ही प्रयत्न केलाच पण हातापायांच काय? थंडीपासून त्यांचं रक्षणही तितकंच गरजेचं आहे ना. मग लोकरीचे अगर इतर उबदार कपडय़ांचे हातमोजे आणि पायमोजे घालून तुम्ही ही समस्याही दूर करू शकता. कडाक्याच्या थंडीत शक्यतो पायात उघडी पादत्राणे जसं चप्पल आणि सॅण्डल्स घालू नका. त्याऐवजी बंद बूट घाला. म्हणजे तुमच्या पायांचाही थंड वाऱयापासून बचाव होईल आणि तुम्हाला उबदारपणा मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या