जलयुक्त शिवार योजनेतील कामे अपूर्णच

सामना ऑनलाईन, मुंबई –

सरकारकडून मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या यशाबद्दल बोलले जात असतानाच प्रत्यक्षात मात्र या योजनेतील १२६५ गावांतील कामे अद्याप सुरू झाली नसल्याची बाब समोर आली आहे. या वर्षभरात केवळ ५८ गावांतीलच कामे पूर्ण झाली असून तब्बल ५२८४ गावांतील कामे पूर्ण झाली नसल्याची कबुलीच जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली.

राज्यातील जलयुक्त शिवार योजना, सिंचन योजनांसंदर्भात २९३ प्रस्तावांतर्गत चर्चेची मागणी करण्यात आली. यावर विरोधी पक्षनेते राधापृष्ण विखे-पाटील यांच्यासह २१ सदस्यांनी यावर केलेल्या चर्चेनंतर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी याला उत्तर देताना जलयुक्त शिवार ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे स्पष्ट केले.

जलयुक्त शिवार योजनेत २०१५-१६ सालात ३५१४ कोटी रुपये खर्च केले असताना चालू आर्थिक वर्षात केवळ ४५५ कोटी खर्च करण्यात आल्याकडे दिलीप वळसे-पाटील यांनी लक्ष वेधले. त्याचप्रमाणे सरकारचे या योजनेतील स्वारस्य कमी झाल्याची टीका केली. याला उत्तर देताना राम शिंदे यांनी २०१६-१७ या आर्थिक वर्षात ५७ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या