सहाव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू 

बोरिवली येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे. जाबीर शेख असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी विकासक आणि कंत्राटदार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

बोरिवलीच्या योगीनगर येथे एका इमारतीचे काम सुरू आहे. तेथे जाबीर हा कडिया काम करायचा. बुधवारी जाबीर हा सहाव्या मजल्यावर काम करत होता. काम करत असतानाच तो वरून खाली पडला. त्याला जखमी अवस्थेत शताब्दी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तिथे मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच एमएचबी पोलीस घटनास्थळी गेले. जाबीरच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विकासक आणि कंत्राटदार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.