राष्ट्रवादी काँग्रेस, सीताराम घनदाट मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

1922

पूर्णा शहरातील शिवसेना कार्यालय येथे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस व सीताराम घनदाट मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लोखंडे, आलेगाव, वझुर, पालम तालुक्यातील पिंपळगाव, मुरुड देव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सीताराम घनदाट मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये पिंपळा लोखंडे येथील पिराजी जाधव, साहेबराव लोखंडे, बालाजी लोखंडे, संतोष पारवे, राजेश लोखंडे, आलेगाव सवराते येथील राष्ट्रवादीचे युवक तालुका उपाध्यक्ष गजानन सवराते, प्रदीप देशपांडे, गायकवाड धुमाळ, वैâलास सवराते, सीताराम घनदाट मित्रमंडळाचे तालुका उपाध्यक्ष आनंद पवार उद्धव पवार, बाबाराव पवार, पिंपळगाव मुरुड येथील राजकुमार सोनटक्के,  गजानन सोनटक्के, भगवान सोनटक्के, ज्ञानेश्वर सोनटक्के, रामेश्वर सोनटक्के, ७० ते ८० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, शहरप्रमुख  मुंजाजी कदम, माजी नगरसेवक संतोष एकलारे, नगरसेवक शाम कदम, अ‍ॅड. राजेश भालेराव, शंकर गलांडे, गोवीद सोलव, बालाजी वैद्य, दिलीप अंबोरे, उद्धव काळे, मनोज हजारे, माणिक सूर्यवंशी, बंडूआप्पा बनसोडे, विकी वैजवाडे, रामजी भालेराव, वैâलास मुळे, साहेब कल्याणकर, दशरथ बोबडे आदींची उपस्थित होती.

आपली प्रतिक्रिया द्या