हिंदुस्थानी वंशाचा राहुल दोषी ठरला ‘चाईल्ड जिनियस’

17
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानी वंशाच्या मुलानं ब्रिटनमधील प्रतिष्ठेची समजली जाणारी प्रश्नमंजुषा स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जिंकून त्यानं ‘चाईल्ड चिनिअस’चा किताब पटकावला आहे. राहुल दोषी असं या हिंदुस्थानी वंशाच्या मुलाच नाव असून तो अवघ्या १२ वर्षाचा आहे. आठवडाभर हा कार्यक्रम सुरू होता, देशातील १९ मुलं या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ब्रिटनच्या ‘फोर के’ टीव्ही चॅनेलवर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं देत १०-४ अशा फरकानं राहुलनं ही स्पर्धा जिंकली. बुद्धिमत्तेच्या जोरावर राहुलनं सगळ्यांचीच मनं जिकली. एकंदर राहुलची बुद्धिमत्ता पाहता तो ब्रिटनच्या मेन्सा बुद्धयांय या स्पर्धेतही सहभागी होऊ शकतो.
आपली प्रतिक्रिया द्या