#WorldCup2019 टीम इंडियासोबत ‘हे’ चार खेळाडूही जाणार इंग्लंडला, कारण…

35

सामना ऑनलाईन । मुंबई

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी सोमवारी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. निवड समितीने घोषित केलेल्या खेळाडूंसह अन्य चार खेळाडूही इंग्लंडला जाणार आहेत. वेगवान गोलंदाज खलील अहमद, आवेश खान, दीपक चहर आणि नवदीप सैनी हे हिंदुस्थानी संघासोबत इंग्लंडला जाणार आहे. फलंदाजांचा नेटमध्ये अभ्यास करून घेण्यासाठी या वेगवान गोलंदाजांना इंग्लंडमध्ये पाठवले जाणार आहे.

#WorldCup2019 12 वर्षानंतर ‘तो’ खेळणार मानाच्या स्पर्धेत

बीसीसीआयच्या निवड समितीने सोमवारी 15 खेळाडूंची घोषणा केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा संघ विश्वचषकामध्ये मैदानात उतरणार आहे. यासह अन्य चार खेळाडूही इंग्लंडला जातील असे बीसीसीआयने स्पष्ट केले. हे खेळाडू विश्वचषकासाठीच्या तयारीसाठी टीम इंडियाची मदत करतील असे बीसीसीआयने सांगितले. इंग्लंडच्या स्वींग होणाऱ्या वातावरणात वेगवान गोलंदाजांकडून नेटमध्ये सराव झाल्याने टीम इंडियाचे फलंदाज चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे.

#WorldCup2019 ‘टीम इंडिया’ची निवड करणारे स्वत: किती क्रिकेट खेळले?

सध्या हे खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघातून खेळत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना सैनीने आपल्या वेगाने सर्वांना चकीत केले आहे. तर चहरने चेन्नई सुपरकिंगकडून खेळताना स्वींग आणि वेगाने फलंदाजांना वेठीस धरले आहेत. आतापर्यंत चहरने 10 बळी घेतले आहेत. तर खलिल आणि आवेश दोघांकडे वेग आहे परंतु अद्याप दोघांनी फक्त एक एक सामना यंदा आयपीएलमध्ये खेळला आहे.

शंकरला लॉटरी, वाचा ट्रोलींग ते थेट विश्वचषक संघात निवडीपर्यंतचा प्रवास
आपली प्रतिक्रिया द्या