#WorldCup2019 ‘टीम इंडिया’ची निवड करणारे स्वत: किती क्रिकेट खेळले?

78

सामना ऑनलाईन । मुंबई

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या निवड समितीने सोमवारी हिंदुस्थानचा संघ जाहीर केला. विजय शंकर या नवख्या खेळाडूवर टीम इंडियाने डाव खेळला आहे. संघ निवडीनंतर रायडू आणि पंतचा समावेश न झाल्याने अनेकांनी आश्चर्याही व्यक्त केले.

विश्वचषकासाठी हिंदुस्थानचा संघ जाहीर; जाडेजा, राहुल, कार्तिकला संधी

विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ निवडण्याची जबाबदारी निवड समितीच्या सदस्यांकडे असते. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद हे आहेत. प्रसाद यांच्यासह देवांग गांधी, शरणदीप सिंह, जतिन परांजपे आणि गगन खोडा हे निवड समितीचे सदस्य आहेत. संघ निवडताना खेळाडूचा गेल्या काही महिन्यांमधील परफॉर्मन्स, फिटनेस आणि अनुभव या गोष्टींकडे निवड समितीचे बारीक लक्ष असते. परंतु क्रिकेटच्या महासंग्रामासाठी जी लोकं संघ निवडतात ते किती क्रिकेट खेळलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया कोणी किती क्रिकेट खेळले आहे.

#WorldCup2019 हिंदुस्थानचा संघ जाहीर, वाचा कधी आहेत हिंदुस्थानचे सामने

एमएसके प्रसाद –
निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांची प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी फारशी प्रभाी नाही. प्रथम श्रेणीच्या 96 सामन्यात त्यांनी सहा शतकांसह 4021 धावा केल्या आहेत. एक दिवसीय क्रिकेटमध्ये 17 सामन्यात फक्त 131 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 6 सामन्यात फक्त 106 धावा त्यांच्या नावावर आहे.

#WorldCup2019 पंतला डावलून कार्तिकला संधी, नेटिझन्समधून आश्चर्याचा सूर

देवांग गांधी –
देवांग गांधी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी धावा जमवल्या आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जास्त अनुभव त्यांच्यापाठी नाही. गांधी यांनी प्रथम श्रेणीच्या 95 सामन्यात 16 शतकांसह 6107 धावा केल्या आहेत. गांधी यांना फक्त 3 एक दिवसीय आमि 4 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. एक दिवसीय क्रिकेटमध्ये 30 तर कसोटीमध्ये 88 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

शंकरला लॉटरी, वाचा ट्रोलींग ते थेट विश्वचषक संघात निवडीपर्यंतचा प्रवास

शरणदीप सिंह –
गांधी यांच्याप्रमाणे शरणदीप सिंह यांनीही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय कारकीर्द छोटी राहिली आहे. प्रथम श्रेणीच्या 92 सामन्यात सिंह यांनी 315 विकेट घेतल्या आहेत. तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये 5 सामन्यात 3 आणि कसोटीमध्ये 3 सामन्यात 10 बळी त्यांच्या नावावर आहेत.

जतिन परांजपे –
जतिन परांजपे यांनी प्रथम श्रेणीमध्ये 62 सामन्यात 13 शतकांसह 3964 धावा केल्या आहेत. परंतु त्यांच्याकडे फक्त 4 आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यांचा अनुभव आहे.

गगन खोडा –
गगन खोडा यांच्याकडे प्रथम श्रेणी क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. खोडा यांनी 132 सामन्यात 20 शतकांसह 8516 धावा केल्या आहेत. यात नाबाद 300 धावा ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. परंतु खोडा यांनी टीम इंडियाकडून फक्त 2 सामने खेळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या