दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो

सामना ऑनलाईन । साऊदम्पटन 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘चोकर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये निराशेचा सामना करावा लागत आहे. पहिल्या तिन्ही लढतींत त्यांना पराभवाचा चेहरा पहावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता त्यांना जागतिक स्तरावरील मानाच्या स्पर्धेतील ‘जिंकू किंवा मरू’ लढतीचा सामना करावा लागणार आहे. फाफ डय़ुप्लेसिसचा दक्षिण आफ्रिकन संघ वेस्ट इंडीजशी दोन हात करताना सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही. कारण आणखी एक पराभव त्यांचा स्पर्धेतील खेळ खल्लास करायला पुरेसा ठरू शकतो.

विंडीज दुसऱ्या विजयासाठी सज्ज
पाकिस्तानला हरवल्यानंतर वेस्ट इंडीजला दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणारा वेस्ट इंडीज संघ उद्या स्पर्धेत दुसऱ्या विजयासाठी जिवाचे रान करील.

आजची लढत
दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडीज,
साऊदम्पटन, दुपारी 3 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या