शिखर तुझे दुःख मी समजू शकतो! सचिनने दिला धवनला धीर

सामना ऑनलाईन । मुंबई

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. बुधवारी बीसीसीआयने याबद्दलची अधिकृत घोषणा केली. शिखर धवनच्या जागी डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला हिंदुस्थानी संघात स्थान मिळाले आहे. यानंतर शिखरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत, “शो मस्ट गो ऑन” असे म्हणत सर्व चाहत्यांचे आभार मानले. यानंतर “मास्टर- ब्लास्टर” सचिन तेंडुलकरने ट्वीट करत धवनला धीर दिला आहे.

वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यामुळे शिखर भावूक, सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर

‘शिखर, तुझे दुःख किती मोठे आहे, हे मी समजू शकतो, पण तू धीर सोडू नकोस. टीम इंडियाला तुझ्यासारख्या धडाकेबाज फलंदाजांची गरज आहे. लवकर बरा हो आणि मैदानात परत. आम्ही सर्व तुझ्या खेळीची वाट पाहात आहोत’, अशा शब्दात सचिन तेंडुलकरने जायबंदी शिखर धवनला धीर दिला आहे.

मी तुझं दु:ख समजू शकतो, विश्वचषक स्पर्धेत ऐन बहरात असताना मधूनच दुखापतीमुळे बाहेर पडणं यासारखी वाईट गोष्ट नाही. तू यामधुन लवकर बाहेर पडशील आणि संघासाठी मोठा पराक्रम साकारशील याची मला खात्री आहे, अशा आशयाचं ट्वrट करत सचिनने शिखरचे सांत्वन केले आहे. सचिनने संघात स्थान मिळवलेल्या डावखुऱ्या ऋषभ पंतलाही विश्वचषकातील चमकदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.