हिंदुस्थानच्या पराभवाने पाकडे आनंदात, जनरल गफूर यांनी ट्विटरवरून डिवचले

77

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

वर्ल्डकपच्या पहिल्या सेमी फायनल लढतीत न्यूझीलंडने हिंदुस्थानचा पराभव केला. या पराभवामुळे हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. हिंदुस्थानच्या संघासह देशातील क्रीडाप्रेमी भावून झाले असतानाच कट्टर प्रतिस्पर्धी आणि शेजारी पाकिस्तानला मात्र आनंद झाला आहे. पाकिस्तानी जनतेसह सैन्यातील मेजर जनरल आणि प्रवक्ते आसिफ गफूर यांनी ट्वीट करून न्यूझीलंडला विजयाच्या शुभेच्छा दिल्या व जुनी खुन्नसही काढली.

‘आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या न्यूझीलंडच्या संघाला विजयाच्या शुभेच्छा. न्यूझीलंडने खेळभावना दाखवली आणि एका महान देशाने नैतिक मुल्यांच्या आधारे सामना खेळला,’ असे ट्वीट जनरल आसिफ गफूर यांनी केले आहे. पाकिस्तानचा संघ सेमी फायनलमध्ये पोहोचू शकला नव्हता. हिंदुस्थानचा संघ इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी हिंदुस्थान जाणूनबुजून हरला आणि खेळ भावनेने खेळला नाही, असा आरोप केला होता.

asif-ghafoor

जनरल आसिफ गफूर यांनी याआधी 5 जुलै रोजी एक वादग्रस्त ट्वीट केले होते. बांग्लादेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानी पोहोचला होता. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानी पोहोचल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन, असे ट्वीट त्यांनी केले होते. तसेच इंग्लंडविरुद्ध खेळताना हिंदुस्थानकडे नैतिक मुल्यांची कमतरता दिसून आली, असेही ते म्हणाले होते.

ghafoor

आपली प्रतिक्रिया द्या