World cup 2019 ठरलं! ‘या’ लढतीत टीम इंडिया भगव्या रंगाच्या जर्सीत उतरणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाच्या विजयाचा वारू वेगाने सुरू आहे. पहिल्या चार लढतीत तीन विजय मिळवत टीम इंडिया पहिल्या चारात विराजमान आहे. टीम इंडियाचा यजमान इंग्लंडसोबत 30 जून रोजी सामना रंगणार आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या लढतीत टीम इंडियाला ‘अल्टरनेट जर्सी’चा (पर्यायी जर्सी) करावा लागणार आहे. या लढतीत टीम इंडियाची ‘मॅन इन ब्लू आर्मी’ भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये दिसून येणार आहे.

शिखर तुझे दुःख मी समजू शकतो! सचिनने दिला धवनला धीर

अमर उजाला‘ने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीच्या नियमांनुसार यजमान संघाला आयसीसी स्पर्धेत खेळताना आपल्या जर्सीचा रंग बदलता येत नाही. त्यामुळे या लढतीत टीम इंडियाला आपली निळ्या रंगाची जर्सी बदलून भगव्या रंगाची जर्सी घालावी लागणाह आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये भगव्या रंगाच्या जर्सीत दिसेल.

टीम इंडियाला धक्का, सरावादरम्यान आणखी एका खेळाडूला दुखापत

टीम इंडियाचा शनिवारी, 22 जून रोजी अफगाणिस्तानशी सामना होणार आहे. दोन्ही संघाची जर्सी निळ्या रंगात आहे. त्यामुळे या लढतीतही गरज पडल्यास टीम इंडिया आपली जर्सी बदलू शकतो. याआधी वर्ल्डकप 2019 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघात सामना रंगला. दोन्ही संघांची जर्सी हिरव्या रंगाची असल्याने आफ्रिका पर्यायी पिवळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरली होती.

टीम इंडियाच्या आगामी लढती –
22 जून – अफगाणिस्तान
27 जून – वेस्ट इंडीज
30 जून – इंग्लंड
2 जुलै – बांगलादेश
6 जुलै – श्रीलंका