पाकिस्तानसाठी आज ‘करो या मरो’, अजेय न्यूझीलंडचा मार्गात अडथळा

सामना ऑनलाईन, बर्मिंगहॅम

यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा मध्यांतर संपून उत्तरार्ध सुरू झालाय. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडने स्पर्धेत अद्याप पराभवाचे तोंड बघितलेले नाही. दुसरीकडे पाकिस्तानसाठी उद्याची लढत ‘करो या मरो’ अशी असेल. त्यामुळे सुस्साट सुटलेल्या न्यूझीलंडचा उद्या (दि.26) पाकिस्तानच्या मार्गात मोठा अडथळा असेल. जर-तरच्या समीकरणात राहण्यासाठी विजय अनिवार्य असलेले पाकिस्तानी खेळाडू मैदानावर सर्वस्व झोकून देण्यासाठी सज्ज झाले असतील.

आजची लढत- पाकिस्तान वि. न्यूझीलंड (बर्मिंगहॅम), थेट प्रक्षेपण दुपारी 3 वा.