शाकिबने केली कपिल, युवीची बरोबरी

69

सामना ऑनलाईन, साऊदम्प्टन

यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने कपिलदेव व युवराज सिंग या हिंदुस्थानी खेळाडूंच्या पराक्रमाची बरोबरी केली. शाकिबने अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत 51 धावांची अर्धशतकी खेळी केल्यानंतर गोलंदाजीमध्ये कमाल करताना पाच बळी टिपले. किश्कचषकातील एकाच सामन्यात अर्धशतक आणि पाच बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा शाकिब हा युकराज सिंहनंतरचा दुसरा क्रिकेटपटू ठरला.

याचबरोबर विश्वचषक स्पर्धेत शतकी खेळी व 5 बळी टिपून शाकिब अल हसनने कपिलदेव व युवराज सिंग यांच्या कामगिरीची बरोबरी केली. कपिलदेव यांनी 1983 च्या, तर युवराज सिंगने 2011 च्या  विश्वचषक स्पर्धेत शतक व 5 बळी टिपण्याचा पराक्रम केला होता. शाकिबने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीजविरुद्ध शतके ठोकलेली आहेत. युवीने आयर्लंडविरुद्धच्या लढतीत अर्धशतकी खेळीनंतर पाच फलंदाज बाद केले होते. त्या पराक्रमाची पुनरावृत्ती शाकिबने अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत केली.

विक्रमांवर नजर

  • वर्ल्ड कपच्या इतिहासात 400 हून अधिक धावा आणि 10 बळी टिपणारा पहिला फलंदाज.
  • एका सामन्यात 50 धावा आणि पाच बळी घेणार दुसरा अष्टपैलू खेळाडू.
  • 29 धावांत पाच बळी, वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशसाठी एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी.
  • वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज.
  • वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा.
  • यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्काधिक धावा फटकाकणारा फलंदाज.

कोणालाच जमलं नाही ते केलं

वर्ल्ड कपच्या इतिहासात कोणालाच जमले नाही ते शाकिब अल हसनने करून दाखवले आहे. विश्वचषक स्पर्धेत 400 हून अधिक धावा आणि 10 बळी अशी कामगिरी करणार तो पहिलाच अष्टपैलू किक्रेटपटू ठरला आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या 6 लढतींत दोन शतके व तीन अर्धशतकांसह 476 धावा फटकावल्या असून गोलंदाजीतही दमदार कामगिरी करताना 10 बळीही टिपले आहे. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत कोणालाच अशी कामगिरी करता आलेली नाही. बांगलादेशचे विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतील अजून दोन सामने शिल्लक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या