जिंकलंस भावा! कर्णधार विराटकडून ‘हिटमॅन’चे कौतुक

84

सामना ऑनलाईन । साऊथॅम्पटन

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील टीम इंडियाचे विजयी अभियान सुरू झाले आहे. बुधवारी पहिल्या लढतीत टीम इंडियाने सलामीवीर रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर द.आफ्रिकेवर 6 विकेट राखून विजय मिळवला. 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने नाबाद 122 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. महेंद्रसिंह धोनीच्या सोबतीने रोहितने हिंदुस्थानी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विजयानंतर कर्णधार विराट कोहली याने मैदानात धाव घेतली आणि संघाच्या शानदार विजयाबद्दल रोहित, ‘जिंकलस भावा!’ अशा शब्दांत रोहितचे आभार मानले

शतकाच्या यज्ञातून उसळे एक विजयी ज्वाला
सर्वाधिक शतकांमध्ये सचिन, विराटनंतर रोहितचा नंबर, गांगुलीचा विक्रम मोडला

“माझ्या मते रोहित शर्माची वन-डे क्रिकेटमधली आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी होती. कारण विश्वचषकासारख्या स्पर्धेत पहिला सामना खेळताना तुमच्यावर थोडासा दबाव हा असतोच. ज्यावेळी तुम्ही फलंदाजीसाठी उतरता आणि एखाद दुसरा चेंडू अनपेक्षित उसळी घेतो तेव्हा शांत चित्ताने फलंदाजी करणं ही सोपी गोष्ट नाही. अशावेळी फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या मोहात पडतो. मात्र रोहितने संयमी खेळ करत डावाला आकार दिला आणि त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूकडून आम्हाला पुढेही अशाच कामगिरीची अपेक्षा आहे,” असे कौतुकाचे उदगार कर्णधार विराटने उपकर्णधार रोहित शर्माची स्तुती करताना काढले.

खेल भी जीतो और दिल भी! पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा
टीम इंडियाची गोलंदाजी समतोल आणि परिपूर्ण! सचिन तेंडुलकर

रोहितने खांद्यावर घेतली संघाची धुरा
बुधवारी दक्षिण आफ्रिकेने समोर ठेवलेल्या 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन स्वस्तात माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 41 धावांची छोटेखानी भागीदारी झाली. विराट कोहली फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि रोहितने पुन्हा एकदा भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. राहुल बाद होऊन परतल्यावर रोहितने आपल्या फटकेबाजीच्या नैसर्गिक खेळाला आवर घालत संघाच्या विजयाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली.त्याने आपले विश्वचषकातील आपले दुसरे शतक ( नाबाद 122 ) तर साकारलेच. पण विराट, धोनीसारखे अनुभवी फलंदाज परतल्यावर मोठ्या निर्धाराने संघाला सलामीच्या विजयाच्या सीमेपार नेले. रोहितच्या या जिद्दी खेळीला सलाम करीत कर्णधार कोहलीने त्याचे मोठे कौतुक केले.

आपली प्रतिक्रिया द्या