टीम इंडियाला धक्का, शिखर-भुवीनंतर आणखी एका खेळाडूला दुखापत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. चौथ्या क्रमांकासाठी दावेदार असणारा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला दुखापत झाली आहे. त्यामुळे उद्या विजय शंकर की दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी संघात स्थान मिळालेला ऋषभ पंत खेळणार यावर सस्पेन्स कायम आहे.

वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यामुळे शिखर भावूक, सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर

उद्या शुक्रवारी टीम इंडिया आणि अफगाणिस्तामध्ये होण्याऱ्या लढतीपूर्वी टीम इंडियाचा सराव सुरू आहे. सरावादरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुहराहचा यॉर्कर चेंडू शंकरच्या पायावर आदळला. विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर तो वेदनेने कळवळला आणि सराव सोडून बाहेर गेला. सध्या त्याची दुखापत गंभीर नसली तरी पायदुखी मात्र कायम आहे.

याआधी शिखर धवनच्या जागी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत विजय शंकर वर्ल्डकपमधील पहिला सामना खेळला. पहिल्याच लढतीत, पहिल्याच चेंडूवर विकेट घेत शंकरने वर्ल्डकपची झोकात सुरुवात केली. या लढतीत त्याने दोन विकेट घेतल्या.