श्रीमंत नाहीत तर तुम्हाला इथे प्रवेश नाही…हा आहे जगातला इलिट क्लब

तुम्ही गडगंज श्रीमंत असाल तर तुम्हाला या क्लबमध्ये प्रवेश मिळेल. हा आहे जगातला एक एलीट सेक्स क्लब. यामध्ये फक्त श्रीमंत, प्रसिद्ध आणि सुंदर लोकांना प्रवेश आहे. इथे प्रवेश मिळविण्यासाठी खूप कसरत करावी लागते. अमेरीकेतील कॅलिफोर्नियामध्ये हा क्लब असून एसएनसीटीएम असे या क्लबचे नाव आहे.

एसएनसीटीएमचे अॅप्लीकेशन प्रक्रिया फार किचकट आहे. इथे फक्त हाय सोसायटीच्या लोकांनाच प्रवेश मिळतो. या सोशल क्लबचे सदस्यत्व मिळविण्यासाठी 57 लाख मोजावे लागतात. त्यानंतर तिकीटाचा खर्च वेगळा असतो. पण यामध्ये चोरवाटही आहे ज्याचा फायदा घेत काही लोकं प्रवेश मिळवतात.. एसएनसीटीएम हाय स्किल्ड परफॉर्मर्स आणि वेटर्सना हायर करतात. त्या परफॉर्मर्सच्या माध्यमातून लोकं प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतात. सध्या परफॉर्मर्स नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डेली स्टारने एका अनुभवी एंटरटेननकडून या पार्टिंबाबात बातचीत केली. त्यांनी सांगितले की, एसएनसीटीएम इव्हेंटमध्ये पाहुणा म्हणून जाणे ही या नोकरीची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कर्मचारी, पाहुणे, कलाकार आणि सदस्य या सर्वांना खूप चांगले वागवले जाते आणि ते एका वेगळ्याच जगासारखे वाटते.

पुढे त्याने सांगितले की, क्रिएटिव्हीटीच्या दृष्टीकोनातून पाहिले तर, क्लबच्या आत अनेक संधी मिळतात. आधीच्या अनुभवानुसार,  समाजाला आणखी चांगले बनविण्यासाठी योगदान देऊ शकतो. आम्ही अनेक शहरांमध्ये काम करतो. पार्ट्या यशस्वी करण्यासाठी आम्ही खूप सखोल नियोजन करतो. प्रत्येक रात्रीची वेगळी थिम असते. ज्यामध्ये कलाकाराला आपल्या आऊटफिटसाठीही नियोजन करावे लागते आणि बरोबर रुटीनही बनवावे लागते.