World News Photo – जगभरातील काही महत्वाच्या बातम्या वाचा फक्त 8 सेकंदात

1562

1) आरोग्य कर्मचाऱ्यांची पगारवाढीसाठी निदर्शने

लंडनमधल्या सेंट थॉमस रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी मोर्चा काढला होता. इंग्लंडमधल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटना पगारवाढीसाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी येत्या काळात मोहीम सुरू करणार आहेत.

uk-doctor-protest

2) लांबलचक स्मशान

ग्वाटेमालामध्ये कोरोनामुळे दगावलेल्यांना पुरण्यासाठी ला वेर्बेना स्मशानात अशा पद्धतीने खड्डे खणण्यात आले आहेत. इथे रविवारपर्यंत 1700 जणांचा मृत्यू झाला होता तर एकूण 45000 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती.

corona-patient-graveyard-guatemala

3) इस्लामची निंदा करणाऱ्याचा खून-

पाकिस्तानातील पेशावर इथल्या न्यायालयामध्ये ताहीर शमीम अहमद नावाच्या व्यक्तीचा खून करण्यात आला. ताहीरवर इस्लामची निंदा केल्याचा आरोप होता. एक तरुण खटला सुरु असलेल्या खोलीत घुसला आणि त्याने ताहीरवर बेछूट गोळीबार केला

pakistan-court-firing

4) अकमलची शिक्षा कमी केली-

मॅच फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याच्यावर 3 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आता 18 महिन्यांची करण्यात आली आहे. अकमल ऑगस्ट 2021 पासून पुन्हा क्रिकेट खेळू शकेल. मात्र अकमल या निर्णयावर खूश नसून त्याने बंदी पूर्ण हटवावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

umar-akmal

5) जपानमध्ये पाऊस, पूर-

जपानच्या उत्तरेकडील भागात मुसळधार पाऊस पडत असून मोगामी नदीला पूर आला आहे. हा फोटो ओआशिदा शहराचा असून हे शहर पाण्याखाली गेले आहे.

japan-flood

आपली प्रतिक्रिया द्या