World News Photo – जगभरातील काही महत्वाच्या बातम्या वाचा फक्त 8 सेकंदात

1563

1) धरणासाठी जल्लोश
इथिओपियातील अदीस आबाबा इथे धरण बांधल्याच्या आनंदात लाखों लोकं रस्त्यावर उतरले होते. जगप्रसिद्ध नाईल नदीवर हे धरण उभारण्यात आले असून त्याला ग्रँड इथिओपिअन रेनेसान्स धरण म्हटलं जात आहे. या धरणामुळे इथिओपिया वीजसंपन्न होईल आणि इथली गरीबी दूर होण्यास मदत होईल असं तिथल्या राज्यकर्त्यांनी म्हटले आहे. इजिप्तने या धरणाला विरोध दर्शवला होता. धरणामुळे नाईल नदीतून त्यांना मिळणारे पाणी कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे. याचा परिणाम सिंचन शेतीवर होण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे.

nile-river-dam-celebration

2) बँक उडवून देण्याची धमकी
युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमधल्या एका बँकेत माथेफिरू घुसला होता. त्याने बॅगेत असलेल्या स्फोटकांच्या सहाय्याने बँक उडवून देण्याची धमकी दिली होती. त्याने काही लोकांना बंधकही बनवून ठेवले होते. यातल्या एका बंक कर्मचाऱ्याला त्याने मोकळे सोडले होते. त्याद्वारे त्याने संदेश पाठवला होता की माध्यमांना त्याच्यासमोर बोलवावे कारण त्याला एक संदेश द्यायचा आहे. या माथेफिरूला अटक करण्यात आली असून त्याचे नाव सुखरोब करीमोव्ह असे आहे.

ukrain-explosive-threat-man-arrested

3) रशियातही मॉल्स सुरू
रशियातही मॉल्स सुरू करण्यात आले असून इथे येणारी मंडळी स्वत:ची काळजी घेत मॉलमध्ये येताना दिसत आहेत. मॉस्को शहर प्रशासनाने लोकांना सार्वजनिक वाहने, बंदीस्त जागी , दुकानांमध्ये मास्क घालणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.mall-in-russia

4) इंग्लंडच्या महिलेला मलेशियात शिक्षा
नवऱ्याला भोसकून मारल्याप्रकरणी समांथा जोन्स नावाच्या महिलेला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मलेशियातील एका रिसॉर्टमध्ये तिने नवऱ्याला चाकू भोसकून खून केला होता. समांथाने आपला गुन्हा कबूल करत कमी शिक्षा व्हावी यासाठी विनंती केली होती. तिला 42 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

samantha-jones

5) भविष्यातील शाळा अशा असतील
इंडोनेशियातील जाकार्ताजवळच्या बेकासी भागातील शाळेतील हे छायाचित्र आहे. इथे वर्गात विद्यार्थ्यांची संख्या कमी असून त्यांच्यात अंतर राखण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी मास्क घातले असून शिक्षिका ही देखील मास्क लावून शिकवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

indonesia-school

 

आपली प्रतिक्रिया द्या