सुगंधी दुनिया

594

धी कधी स्वतःची नोकरी करत असताना एखादी कला किंवा छंद जोपासावा असे वाटते. जोपासलेला हा छंद नंतर तुमचा उद्योगही होऊ शकतो किंवा जोडधंदाही होऊ शकतो. अशाच प्रकारे ‘परफ्युम मेकिंग’ म्हणजे अत्तर तयार करणे हीही एक कला आहे. ही कला उत्पन्नाचे साधनही होऊ शकते.

वातावरण आनंददायी करण्याचे किंवा उत्साह वाढवण्याचे काम अत्तर करते. अत्तर तयार करणे या विषयामध्ये करीयर करणारे विद्यार्थी व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. तसेच अत्तर तयार करण्याचे डिप्लोमा कोर्सेसही उपलब्ध आहेत.

घरच्या घरी करता येणारा व्यवसाय
अत्तर बनवण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वस्तूंद्वारे घरच्या घरीही अत्तर तयार करू शकता. काही सुगंधित उत्पादने, अल्कोहोल, काही तेलं, फुले, मसाले इत्यादी अत्तर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू घाऊक किमतीत विकत घेऊन घरच्या घरीही विविध प्रकारच्या सुगंधित अत्तरची निर्मिती करू शकता.

अभ्यासक्रम
l जाई, जुई, मोगरा, मालती, मदनबाण, गुलाब, केवडा, सोनचाफा, हिरवा चाफा, मरवा, दवणा, तमाल, दालचिनी, लवंग, जायफळ, केशर, चंदन अशी काही औषधी आणि सुवासिक तेले द्रव्यांमध्ये मिसळून त्यापासून अत्तर कसे तयार करावे हे या अभ्यासक्रमात शिकवले जाते.
l अत्तर तयार करण्यासाठी जलीय आणि बाष्पीय पद्धत कशी वापरावी.
l संत्र, लिंबू इत्यादींपासून तेल तयार करण्याची पद्धत
l सुवासिक द्रव्यनिर्मिती कशी करावी इत्यादी विषय या अभ्यासक्रमात शिकवले जातात.

शिकवणाऱ्या संस्था
l बॉम्बे परफ्युमरी, ३१, मनोज इंडस्ट्रियल इस्टेट, जी.डी.आंबेकर रोड, मुंबई – ३१.
l नटराज अकादमी, चंद्रभागा अपार्टमेंट, बी २, तळमजला, सिंहगड रोड, आनंदनगर, पुणे – ५१.

संधी
l लघुउद्योग किंवा नेहमीची नोकरी करता करता आवड म्हणून अर्धवेळही परफ्युम मेकिंगचा व्यवसाय करू शकता.
l उत्साह वाढवण्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवरचे सुगंधित अत्तर वापरतात.
l पूजेसाठीही अत्तराचा वापर करतात.
l सुगंध निर्माण करणारी इतरही उत्पादने तयार करता येतात. उदा. अगरबत्ती, परफ्युम, फ्रिजमध्ये सुगंध येण्यासाठी इत्यादी

आपली प्रतिक्रिया द्या