रस्त्यांवरील सुरक्षेसाठी दिग्गज सरसावले, वर्ल्ड सीरिज टी-20चे हिंदुस्थानात आयोजन

560

हिंदुस्थानात रस्त्यांवर अपघाती मृत्यू झालेल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर या माजी दिग्गज क्रिकेटपटूंसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील महान खेळाडूंनी पुढाकार घेत वर्ल्ड सीरिज टी-20 स्पर्धा आयोजनाचे निमित्त साधून ‘रोड सेफ्टी’ या मोहिमेला सुरुवात केली आहे. मुंबईतील एका पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. यावेळी सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग या हिंदुस्थानच्या माजी क्रिकेटपटूंसह वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा, दक्षिण आफ्रिकेचा जॉण्टी ऱ्होडस्, ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान या खेळाडूंची उपस्थिती होती. उपस्थित क्रिकेटपटू आपापल्या देशांचे नेतृत्वही करणार आहेत.

लायसेन्स देताना काळजी घ्या!
आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसेन्स देताना तितकीशी काळजी घेतली जात नाही. एखाद्याला परिपूर्ण माहिती नसेल किंवा त्याला गाडी नीट चालवता येत नसेल तर त्याला लायसेन्स देणे योग्य नव्हे, असे स्पष्ट अन् परखड मत सुनील गावसकर यांनी यावेळी व्यक्त केले.

4 ते 16 फेब्रुवारीदरम्यान होणार स्पर्धा
वर्ल्ड सीरिज टी -20 या स्पर्धेचे आयोजन पुढल्या वर्षी 4 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. ही स्पर्धा दरवर्षी हिवाळ्यात खेळवण्याचा आयोजकाचा मानस आहे. तसेच सुरुवातीला मुंबई व पुण्यात या स्पर्धेतील लढती होतील. यामध्ये पाच देशांचे खेळाडू सहभागी होतील.

आपली प्रतिक्रिया द्या