WTC Final India vs New Zealand – 3 हिंदुस्थानी क्रिकेटपटू जे होऊ शकतात ‘मॅन ऑफ द मॅच’

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship 2021) म्हणजेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकून न्यूझीलंडसोबतचा जुना हिशेब पूर्ण करण्यासाठी हिंदुंस्तानी संघ सज्ज झाला आहे. यापूर्वी 2000 साली झालेल्या ICC Knockout स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 साली विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडनंच टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. आता अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत या पराभवांचा वचपा काढण्याची संधी टीम इंडियाला मिळाली आहे. टीम इंडियाने ही फायनल जिंकली तर कोणते 3 भारतीय खेळाडू ‘मॅन ऑफ द मॅच’ चा (3 Mom for Team India) किताब पटकावण्यात यशस्वी ठरु शकतात ते पाहूया

रोहित शर्मा

rohit-sharma-century-england-tour

‘विदेशातील ग्राऊंडवर तो फेल होतो’, ही ओरड बंद करण्याची संधी रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे आहे. हिंदुस्थानी संघाचा सलामीचा फलंदाज म्हणून एक मोठी खेळी खेळण्याची संधी रोहितला आहे. रोहितनं सुरुवातीचा एक तास खेळून काढला तर तो साऊथम्पटनमध्ये दिवसभर खेळू शकतो. रोहित दिवसभर खेळला तर तो 200 आणि टीम इंडिया 350 धावसंख्या सहज ओलांडू शकतात. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रोहितची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने फक्त 11 टेस्टमध्ये 1000 पेक्षा जास्त रन केले आहेत. अजिंक्य रहाणेला मागे टाकत हिंदुस्थानतर्फे सर्वात जास्त रन करण्याची संधी रोहितला आहे. रोहितकडे इतरांपेक्षा बॉल खेळण्यासाठी एक सेकंद जास्त असतो. साऊथम्पटनमध्ये उशिरा बॉल खेळणे हे अधिक फायद्याचं आहे. हाच कानमंत्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) टीम इंडियाच्या बॅट्समन्सना दिला आहे.

विराट कोहली

virat-kohli

विराट कोहलीनं (Virat Kohli) 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावलं होती. त्यानंतर 2020 असं पहिल्यांदाच घडलं की एका कॅलेंडर वर्षात त्याला एकही शतक झळकावता आलं नाही. विराटनं शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होती. शतकांचा हा दुष्काळ संपवून एक ‘विराट इनिंग’ खेळण्याची योग्य संधी हिंदुस्थानी संघाच्या कर्णधाराला या अंतिम सामन्याच्या निमित्ताने चालून आली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध विराटनं कसोटी सामन्यांमध्ये 51.53 च्या सरासरीनं 773 धावा केल्या आहेत. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. तर एकदिवसीय सामन्यात त्याने 59.91 च्या सरासरीनं 1378 धावा गोळा केल्या आहेत. सध्या खूप मोठी हवा भरलेल्या न्यूझीलंडच्या बॉलिंगला टाचणी लावण्याची क्षमता विराटकडे आहे. विराटनं ती टाचणी लावली तर ‘मॅन ऑफ द मॅच’ (3 Mom for Team India) तोच असेल.

रवींद्र जडेजा

ravindra-jadeja-4

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या ज्या फॉर्मात आहे, ते पाहून त्याला Playing XI मधून वगळण्याचा मुर्खपणा जगातील कोणतीही टीम करणार नाही. तीन वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध ओव्हल टेस्टमध्ये जडेजानं चार बळी टीपले होते आणि 86 धावांची खेळी साकारली होती. या खेळीनंतर जडेजाला त्याच्यातला बॅट्समन पुन्हा नव्याने गवसला होता.

न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या (Cricket World Cup 2019) उपांत्य सामन्यात जडेजानं आठव्या क्रमांकावर येत 77 रन काढले होते. जडेजानं त्यावेळी अशक्य वाटणारा विजय खेचून आणू शकेल असं वाटायला लागलं होतं. त्यावेळी अर्धवट राहिलेलं काम यंदा पूर्ण करण्याची जडेजाला संधी आहे. त्याच्या बॉलिंगमध्ये अनुभवाची धार आलीय. तर कोणतीही जमलेली जोडी फोडण्याची क्षमता त्याच्या अचूक क्षेत्ररक्षणामध्ये आहे. फलंदाजी , गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील परफेक्ट पॅकेज असलेला जडेजा फायनलमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ चा (3 Mom for Team India) प्रबळ दावेदार आहे.

(वृत्त सौजन्य – https://cricketmarathi.com )

आपली प्रतिक्रिया द्या