WTC IND vs NZ फायनलपूर्वी विराट कोहलीचे आश्चर्यचकित करणारे विधान, म्हणाला; 5 दिवसाच्या लढतीवरून…

पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. हिंदुस्थान आणि न्यूझीलंड या दोन संघात इंग्लंडमध्ये हा अंतिम सामना रंगणार आहे. दोन्ही संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकण्यास उत्सुक आहेत. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आश्चर्यचकित विधान केले आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकणारा संघ सर्वश्रेष्ठ ठरणार आहे. मात्र 5 दिवसांच्या एका कसोटी लढतीवरून कोणता संघ सर्वश्रेष्ठ आहे हे पाहणे योग्य ठरणार नाही, असे विधान विराट कोहली याने केले आहे. तसेच हा अंतिम सामना हिंदुस्थानच्या संघासाठी इतर कसोटी लढतीसारखाच एक असणार आहे, असेही विराट म्हणाला.

‘5 दिवसांच्या एका कसोटी लढतीवरून कोणता संघ सर्वश्रेष्ठ आहे हे ठरवणे योग्य नाही. ज्या लोकांना कसोटी लढतीबाबत कळते आणि ज्यांना माहिती आहे गेल्या 4 ते 5 वर्षात काय झालंय त्यांना या एका लढतीमुळे फरक पडणार नाही, असे विराट कोहली म्हणाला. तसेच या लढतीच्या निकालाचा टीम इंडियावर कोणताही प्रभाव पडणार नसल्याचे तो म्हणाला. जय आणि पराजय हा खेळाचा एक भाग असल्याचे विराट म्हणाला.

WTC Final – ‘हिटमॅन’ सावधान! फायनलपूर्वी लक्ष्मणचा रोहितला ‘VVS’ सल्ला

तुम्ही इतिहासात डोकावून कोणत्या गोष्टी तुमच्या बाजूने आणि विरोधात गेल्या हे पाहू शकता, मात्र तुम्हाला प्रत्यक्ष लढतीत कधी विजय तर कधी पराभव पाहायला लागू शकतो. जर हा सामना टीम इंडियाने जिंकला तरी आमच्यासाठी क्रिकेट थांबणार नाही, तसेच या लढतीत आमचा पराभव झाला तरीही आमच्यासाठी क्रिकेट थांबणार नाही, असेही विराट म्हणाला.

WTC Final India vs New Zealand – 3 हिंदुस्थानी क्रिकेटपटू जे होऊ शकतात ‘मॅन ऑफ द मॅच’

अंतिम सामन्यासाठी हिंदुस्थानचा संघ – 

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.

आपली प्रतिक्रिया द्या