कसोटी चॅम्पियनशिपची गुणपद्धती अन्यायकारक

489

हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्यापासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत असून या लढतीच्या पूर्वसंध्येला न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणपद्धतीवर टीका केली आहे. आयसीसीच्या या स्पर्धेतील गुणपद्धती अन्यायकारक असल्याचे तो यावेळी म्हणाला.

न्यूझीलंडच्या केन विल्यमसनची नाराजी

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एका लढतीसाठी 60 गुण देण्यात येत आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत मात्र एका लढतीसाठी फक्त 24 गुण देण्यात येत आहेत. हा फरक योग्य नव्हे. कारण काही संघ दोन सामन्यांची मालिका खेळतात तर काही संघ पाच सामन्यांची मालिका खेळतात, असे केन विल्यमसन पुढे म्हणाला.

ही तर सुरुवात

आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिपचा श्रीगणेशा करून उत्तम पाऊल टाकले आहे. सुरुवात चांगली केली आहे. फक्त गुणपद्धतीवर आणखी लक्ष द्यायला हवे. यामध्ये आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, असे केन विल्यमसन व रॉस टेलर यांनी आवर्जून सांगितले.

  • आजपासून पहिली कसोटी न्यूझीलंड-हिंदुस्थान, पहाटे 4 वाजता, वेलिंग्टन
आपली प्रतिक्रिया द्या