पाच वर्षांत टीबीमुळे मुंबईत 11 हजार 796 जणांचा मृत्यू; पुरुषांपेक्षा महिलांना टीबीची लागण जास्त

मुंबई टीबीमुक्तीसाठी पालिका अनेक उपाययोजना करीत असली तरी गेल्या फक्त पाच वर्षांत टीबीमुळे (क्षयरोग) मुंबईत तब्बल 11 हजार 796 जणांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्याच आकडेवारीतून समोर आले आहे.  गेल्या पाच वर्षांत 2 लाख 43 हजार 751 टीबीच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांमध्ये टीबी (क्षयरोग)ची लागण होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 2020 ते 2022 या तीन वर्षांत 75 हजार 034 महिलांना टीबीची लागण झाली असून 68 हजार 518 पुरुषांमध्ये टीबीचे निदान झाले आहे.

मुंबई क्षयरोगमुक्तीसाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध स्तरावर उपक्रम राबवले जातात. 2025 पर्यंत मुंबई टीबीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले असून तीन वर्षांच्या तुलनेत 2022 मध्ये 76 टक्के म्हणजे 76 हजार टीबी रुग्णांचा शोध घेतला आहे. मुंबईत गेल्या तीन वर्षांत 1 लाख 27 हजार 251 टीबीचे रुग्ण आढळले आहेत, तर 86 हजार 785 रुग्णांनी टीबीला हरवले आहे.

टीबीची लक्षणे

 हलका, परंतु रात्री येणारा ताप , घटणारे वजन , भूक कमी होणे , बेडक्यातून रक्त पडणे , थकवा , छातीत दुखणे , रात्री येणारा घाम , मानेला गाठी येणे