तिसऱ्या महायुद्धाला १३ मे पासून तोंड फुटणार, अमेरिकेतील ज्योतिषाचा दावा

20

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

येत्या १३ मे रोजी तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल आणि ते १३ ऑक्टोबर पर्यंत चालेल. महायुद्धाने महाविनाश होईल, असा दावा अमेरिकेतील क्लॅरव्हॉयंट होरसिओ व्हिलेगास (Clairvoyant Horacio Villegas) नावाच्या ज्योतिषाने केला आहे.

सीरिया प्रश्नावरुन अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव वाढत आहे. हा तणाव आणखी वाढेल आणि १३ मे पासून महायुद्धाला सुरुवात होईल असा दावा अमेरिकेतील ज्योतिषाने केला आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी, बायबलमधील (ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ) संकेत आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास याआधारे त्याने हा दावा केला आहे.

एक खोटी बातमी वेगाने जगभर पसरेल, अमेरिका आणि रशिया यांच्यातील संघर्षाने महायुद्धाला तोंड फुटेल असे अमेरिकेतील ज्योतिषाने सांगितले. महायुद्धात अणुबॉम्ब तसेच इतर संहारक अस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल. ठिकठिकाणी आग लागेल आणि नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळतील. महाविनाश होईल; असेही अमेरिकेतील ज्योतिषी म्हणाला.

ख्रिश्चन धर्मातील कॅथलिक पंथात एक गोष्ट अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. लेडी ऑफ फातिमाने १३ मे १९१७ रोजी पोर्तुगाल येथे नागरिकांना उद्देशून एक संदेश दिला होता. रशियात राहणाऱ्या नास्तिक लोकांच्या वागणुकीत बदल झाला तर १०० वर्षांनी आस्तिक आणि नास्तिक यांच्यात संघर्ष होईल असा तो संदेश होता.

सध्याच्या काळात साम्यवादी विचारांच्या रशियाचा अमेरिका जगभर करत असलेल्या राजकारणाला विरोध आहे. सीरियात असद यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत सरकार अमेरिकेने हटवू नये असे असे रशियाचे मत आहे. तर असद यांचे सरकार दहशतवाद्यांना मदत करत असल्यामुळे त्यांना हटवावे असे मत अमेरिका व्यक्त करत आहे. सीरियात झालेला रासायनिक हल्ला असद सरकारच्या आदेशाने सीरियाच्या लष्करानेच केला असा आरोप अमेरिका करत आहे. या उलट इसिस या दहशतवादी संघटनेशी लढण्याच्या नावाखाली अमेरिका रशियाशी मैत्री करणारे असद सरकार पाडून एक कमकुवत पण अमेरिका धार्जिणे नेतृत्व तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप रशिया करत आहे. सीरिया प्रश्नावरुन अमेरिका आणि रशिया यांच्यात निर्माण झालेली ही कटुता लवकरच गंभीर रुप घेईल आणि महायुद्ध सुरू होईल असा दावा अमेरिकेतील ज्योतिषाने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या