जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप; मेरी कोम उपांत्यपूर्व फेरीत

417

हिंदुस्थानची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने येथे सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील 51 किलो वजनी गटात धडाकेबाज कामगिरी करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. हिंदुस्थानच्या स्विटी बुरा हिला मात्र 75 किलो वजनी गटात उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली मेरी कोम 51 किलो वजनी गटात पहिल्यांदाच जगज्जेती होण्यासाठी सज्ज झाली आहे. मेरी कोमच्या झंझावातासमोर मंगळवारी थायलंडच्या जुतामस जितपोंग हिचा निभाव लागला नाही. मेरी कोमने ही लढत 5-0 अशा फरकाने सहज जिंकली. तिसऱ्या सीडेड मेरी कोमला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली होती.

 अन् ती हरली

स्विटी बुरा व लॉरेन प्राइस यांच्यामधील लढत रोमहर्षक झाली. लॉरेन प्राइस हिने युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच मागील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक जिंकण्यातही तिला यश लाभले आहे. त्यामुळे स्विटी बुरासमोर खडतर आव्हान असेल यात शंका नव्हती. मात्र हिंदुस्थानच्या खेळाडूने प्रतिस्पर्ध्याला कडवी झुंज दिली. अखेर पंचांनी या लढतीत 3-1 अशा फरकाने प्रतिस्पर्ध्याला विजयी घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या