WWC – बजरंगाची कमाल, आणखी दोन पहिलवानांना टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट

581

विनेश फोगाट पाठोपाठ हिंदुस्थानच्या आणखी दोन पहिलवांनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले आहे. पुरूष गटामध्ये वर्ल्ड नंबर वन बजरंग पुनिया (65 किलो) आणि रवि कुमार दहिया (57 किलो) या दोघांना जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपच्या उपांत्या फेरीमध्ये प्रवेश केला. यासह दोघांनाही ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे.

उपांत्यपूर्व फेरीमध्ये बजरंग पुनिया याने कोरियाच्या पहिलवानाचा 8-1 असा धुव्वा उडवला. आता उपांत्यफेरीमध्ये बजरंग पुनियाचा सामना कझाकिस्तानचा पहिलवान दौलत नियाजबकोव याच्याशी झाला. या लढतीत त्याला पराभव सहन करावा लागला. दुसरीकडे तर रवि कुमार याने कोरियाच्या किम संगवोन याचा 11-0 असा पराभव केला आणि उपांत्यफेरीत प्रवेश केला. उपांत्यफेरीत त्याला रशियाच्या जवार उगेव याच्याकडून पराभव सहन करावा लागला.

साक्षि-दिव्याचा पराभव
रियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षिला 62 किलो वजनी गटात पहिल्या फेरीत पराभव सहन करावा लागला. 0-6 ने पिछाडीवर असताना साक्षिने संपूर्ण जोर लावला, मात्र अखेर तिचा 7-10 असा पराभव झाला. दुसरीकडे 62 किलो वजन गटात दिव्या काकरण हिला रियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या सारा दोशो हिच्याकडून 0-2 असा पराभव सहन करावा लागला. आता दोघींच्या पदकाच्या आशा रेपेचेज राऊंडवर टिकून आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या