अजबच! महिला असतानाही बाळंत आणि पुरूष असतानाही दिला बाळाला दिला जन्म

115

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये एका ट्रान्सजेंडर पुरूषाने बाळाला जन्म दिला आहे. गेले चार वर्षांपासून ही व्यक्ती आपल्या जोडीदारासोबत महिला बनून राहत आहे. केसी सोलिवन असं या व्यक्तीचं नाव असून हे तिचं ट्रान्सजेंडर म्हणून पहिलंच बाळ आहे. सोलिवन ही जगातील पहिली अशी व्यक्ती आहे. ज्या व्यक्तिने ट्रान्सजेंडर असूनही एका बाळाला जन्म दिला आहे.

सोलिवन याआधी एक महिला म्हणून आयुष्य जगत होती. तिला तिच्या पहिल्या पतिपासून एक आपत्य असून ते पाच वर्षाचे आहे. परंतु सोलिवन गेले चार वर्षापासून ट्रान्सजेंडर पुरूष बनून आपल्या जोडीदारासोबत राहत आहे. स्टीवन असे सेलिवनच्या जोडीदाराचे नाव असून तो २७ वर्षांचा आहे. या दोघांचे बाळ सुदृढ असून त्याचे वजन ३ किलो ६०० ग्रॅम आहे. आपण गरोदर असल्याचे समजताच सेलिवनने पुरूष हार्मोन्स घेणे थांबवले होते.

सोलिवन आणि स्टीवनने बाळाच्या लिंगाचा खुलासा करणे टाळले असून बाळ मोठे झाल्यावर आपल्या लैंगिकतेबाबत स्वतःच निर्णय घेईल असे त्यांनी म्हटले आहे्. ज्यावेळी सोलिवन गरोदर राहिली त्यावेळी या दोघांवर अनेक लोकांनी सोशल मीडियावरून टीका केली होती. परंतु त्यादोघांनीही आपल्या निर्णयावर ठाम राहून बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. ट्रान्स-पालकत्वाविषय लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे त्यांना वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या