‘या’ छोट्या देशात आहे जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण!

3033
उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये सोन्याची खाण असल्याचे वृत्त पसरल्यापासून हा जिल्हा चर्चेत आला आहे. या जिल्ह्यात सुमारे तीन हजार टन सोन्याचा साठा असल्याचे वृत्त आले होते. मात्र, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त फेटाळले असून या भागात फक्त 160 किलो सोने असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या खाणीत नेमके किती सोने आहे, याबाबतच्या चर्चा सुरू आहे. मात्र, एका छोट्या देशात जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे.
इंडोनेशियाच्या ग्रासबर्गमध्ये जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. या खाणीत सोन्यासह. चांदी आणि तांब्याचाही मोठ्या प्रमाणात साठा आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वात मोठा तांब्याचा साठा आहे. अमेरिकेतील फ्रीपोर्ट-मॅकमोरन कंपनी या खाणीतून सोने, चांदी आणि तांब्याचे उत्खनन करण्याचे काम करते. या खाणीत 51 टक्के वाटा इंडोनेशिया सरकारचा आहे. दरवर्षी ग्रासबर्गमधील खाणीतून हजारो टन सोने, चांदी आणि तांबे काढण्यात येते. या खाणीचे क्षेत्रफळ 5 लाख 27 हजार एकर  आहे. या ठिकाणी भूपुष्ठ आणि भगर्भ अशा दोन्ही पद्धतीने उत्खनन करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून या खाणीत उत्खनन सुरू असूनही या खाणीत अजूनही मोठ्या प्रमाणात साठा शिल्लक आहे. अजूनही या खाणीत 72 हजार कोटींचा सोन्याचा साठा शिल्लक आहे. या साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यताही आहे. या खाणीत सुमारे 18 हजार जण काम करतात. ग्रासबर्गनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सोन्याची खाण अमेरिकेतील नेवादाच्या एल्कोवमध्ये आहे. ही खाण 6 लाख 91 हजार एकर क्षेत्रफळावर पसरली आहे. या खाणीतूनही दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्खनन करण्यात येते.
आपली प्रतिक्रिया द्या