एक, दोन नव्हे तर ८० भाषेत गाणी गाणारी मुलगी

55

सामना ऑनलाईन । दुबई

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या विक्रमाची नोंदणी करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. दुबईच्या इंडियन हायस्कूलमध्ये सातवीत शिकत असलेल्या सुचेता सतीशने नव्या विश्वविक्रमाची तयारी सुरू केली आहे. सध्या ती ८० भाषांमध्ये गाणे गाऊ शकते. या पुढे जाऊन ती ८५ भाषांमध्ये गाणी गाऊन नवा विश्वविक्रम करण्याची तयारी करत आहे.

सुचेताचे बालपण केरळमध्ये गेले. मात्र मागील काही वर्षांपासून ती दुबईतच वास्तव्यास आहे. येत्या २९ डिसेंबरला ती ८५ भाषांमध्ये गाणी गाऊन नवा विश्वविक्रम करण्याची तयारी करत आहे. सुचेताला विदेशी भाषेतले गाणे शिकण्यासाठी जेमतेम दोन तास पुरतात. एखाद्या गाण्याचे उच्चार सोपे असल्यास शिकण्याचा वेळ आणखी कमी होतो. फ्रेंच, जर्मन आणि हंगेरियन भाषा शिकण्यासाठी सुचेताला जास्त वेळ द्यावा लागला मात्र सध्या तिच्या विविध भाषेतील शिक्षणाचा वेग वाढला आहे.

आधीचा विक्रम

सर्वात जास्त भाषेत गाणी गाण्याचा विक्रम आंधप्रदेशच्या केसिराजू श्रीनिवास यांच्या नावे आहे. २००८ साली श्रीनिवास यांनी ७६ भाषेत गाण्यांचे गायन करीत हा विक्रम आपल्या नावे केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या