पूजेसाठी आसन

110

> हिंदू धर्मात पूजा-पठण, मंत्र-हवन, साधना, तप करताना विशिष्ट आसनावर बसून करायचे असे सांगितले आहे. त्यामुळे धार्मिक कार्य केल्याने त्या व्यक्तीची सात्त्विक आणि आत्मिक शुद्धता होते, त्यातून अनेक लाभ मिळतात.

> योग्य आसनावर बसून पूजा पाठ केल्यास चेहऱ्यावर तेजस्वीपणा येतो.

> गवत पसरुन त्यावर बसून मंत्रजप केल्यास केल्यास त्यांचे कार्य योग्य पार पडते.

> धार्मिकदृष्टय़ा पूजापाठ करताना नेहमी लाल, पांढरा किंवा नवा कोरा कपडा वापरावा. असे करणे शुभ मानले जाते.

> पुरातन काळात ऋषी-महर्षी वाघाच्या कातडीपासून तयार केलेले आसन वापरायचे. त्यामुळे मन एकाग्र होते हे खरेच.

> जमिनीवर बसून धार्मिक कर्मकांड केल्यास माणसाची दुःखे वाढतात असा समज आहे.

> दगडावर बसून आराधना केल्यास आजार वाढतात.

> जर कोणी पानांवर बसून कर्मकांड करत असेल तर त्यांचे चित्त थाऱयावर राहत नाही असेही म्हटले जाते.

> लाकडावर बसून कर्मकांड करत असाल कर घरात दारिद्रय़ येते म्हणतात.

आपली प्रतिक्रिया द्या