एका क्लिकवर देवपूजा!

सध्याच्या व्यस्त जीवनात देवपूजा दररोज करणे शक्य होतेच असे नाही, मात्र आता यावर उपाय म्हणून ‘माय ओम नमो’ हे देवपूजेचे ऍप विकसित करण्यात आले आहे. यामुळे घरात पूजेचे आयोजन करणे, पूजा साहित्य आणणे, पूजेसाठी भटजी बोलावणे इ. सर्व कामे एका क्लिक वर सहज शक्य होणार आहेत. यंदाच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या ऍपद्वारे ग्राहक ऑनलाइन पूजासेवेला सुरुवात करू शकतात. या ऍपवर वेगवेगळ्या प्रकारच्या १०६ पूजा सेवा तसेच १८ विविध सेवा १२ भाषांमध्ये उपलब्ध आहेत, असे ‘माय ओम नमो’चे संचालक मकरंद पाटील यांनी सांगितले.