अल्पवयीन कबड्डीपटूच्या बलात्कारप्रकरणी कुस्तीपटूला अटक

crime women

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिल्ली पोलिसांनी एका राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळलेल्या कुस्तीपटूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. १६ वर्षांच्या कबड्डीपटूने तिच्यावर बलात्कार झाल्याची दिल्ली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी रात्री नरेश दहिया याला अटक केली. आहे. दहिया हा कराला गावचा रहिवासी असून छत्रसाल स्टेडीयममध्ये विद्यार्थ्यांना तो कुस्तीचं प्रशिक्षण देतो. दहिया याला अटक केल्यानंतर त्याने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली.

पिडीत मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं की तिच्यासोबत हा प्रसंग ९ जुलै रोजी झाली. दहिया याने छत्रसाल स्टेडियमबाहेर मुलीला गाठलं आणि काही महत्वाच्या लोकांशी ओळख करून देतो असं सांगून रोहिणी भागातील एका फ्लॅटवर घेऊन गेला. तिथे दहियाने मला गुंगीचं औषध घालून कोल्डड्रींक प्यायला दिलं जे प्यायल्याने मी बेशुद्ध पडले असं पिडीतेने पोलिसांना सांगितलं. बेशुद्ध झाल्यानंतर त्याने आपल्यावर बलात्कार केला असं या मुलीने तक्रारीत म्हटलं आहे. या मुलीची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली होती, ज्यामध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या