
सामना ऑनलाईन । इंदुर
हिंदुस्थानी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहानं एम.एस. धोनीच्या निवृत्तीनंतर हिंदुस्थानी संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना वृद्धिमान साहानं बंगळूरू विरूद्ध झालेल्या सामन्यात यष्टीमागे अफलातून झेल घेतला आहे.
सोमवारी पंजाब आणि बंगळूरूमध्ये झालेल्या सामन्यात वरुण अॅरॉणच्या गोलंदाजीवर बंगळूरूच्या मंदीप सिंहचा अविस्वसनीय झेल साहानं पकडला. वरूणच्या गोलंदाजीवर मंदीपनं जोरदार फटका मारल्यानं चेंडू उंच गेला, यष्टीमागे वृद्धिमान साहानं उलट्या बाजूला पळत जात झेल पकडला आणि मैदानात प्रेक्षकांनी जल्लोष केला. पंजाबनं या सामन्यात बंगळूरूचा आठ गडी राखून पराभव केला. हा झेल घेतल्याचा व्हिडिओ स्वत: वृद्धिमान साहानं ट्विटरवर शेअर केला आहे.
पाहा व्हिडिओ :
— wriddhiman saha (@Wriddhipops) April 10, 2017