लेखिका, चित्रपट समीक्षक अनिता पाध्ये यांना पुरस्कार 

221

विनोदाचे बादशाह, शाहीर दादा कोंडके यांच्या जन्मदिनानिमित्त ‘दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन’ या पुण्यातील संस्थेतर्फे दरवर्षी ‘समाजभूषण ’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाचा हा समाजभूषण पुरस्कार लेखिका, चित्रपट समीक्षक अनिता पाध्ये यांना जाहीर झाला आहे. गेल्या 33 वर्षांहून अधिक काळ अनिता पाध्ये यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्र आणि मासिकांतून सिनेमाविषयक विपुल लिखाण केले आहे. दादा कोंडके यांच्या  ‘एकटा जीव’  या आत्मचरित्राच्या त्या लेखिका आहेत. या पुस्तकाच्या आजवर अकरा आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. लॉकडाऊन संपल्याकर हा सोहळा होणार आहे. या पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल त्यांनी फाऊंडेशनचे आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या