मानाचि – टीव्ही मालिका लेखन स्पर्धा

सामना ऑनलाईन । मुंबई

मालिका, नाटक आणि चित्रपट लेखकांच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील उदयोन्मुख लेखकांसाठी ‘टीव्ही मालिका लेखन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. लेखकांनी टीव्ही मालिकेला साजेशी एक कथा, त्या कथेवर आधारित मालिकेच्या पहिल्या भागाची पटकथा संवादासह ‘मानाचि’ manachilekhanspardha @gmail.com या ई-मेलवर १० जानेवारी २०१८ पूर्वी पाठवा.

तीन उत्तम कथा, पटकथा आणि संवादलेखकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. तसेच ‘मानाचि’ लेखक संघटना आयोजित ‘मालिका लेखन कार्यशाळा’ या विशेष कार्यशाळेत मोफत प्रवेश देण्यात येईल. या कार्यशाळेत आवश्यकतेनुसार तुमच्यातील लेखकाला मान्यवर लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शकांकडून पैलू पाडण्यात येतील. तसेच आघाडीच्या मराठी वाहिन्यांशी संपर्क आणि लेखनाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. लेखन पूर्णतः स्वतंत्र व नवीन असावे. अधिक माहितीसाठी मानाचि लेखन स्पर्धा या फेसबुकपेजवर किंवा ९८२० ५९४ ६५३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.