शाओमीचा रेडमी ४ए स्मार्टफोन लाँच

19

सामना ऑनलाईन, मुंबई

स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या शाओमी या चिनी कंपनीने स्वस्तात मस्त म्हणत केवळ ५९९९ रुपये एवढ्या कमी किमतीत रेडमी ४ए हा अत्याधुनिक स्मार्टफोन लाँच केला आहे. ४जी वोल्टइ सपोर्टिव्ह असलेला हा फोन वेगवेगळ्या आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. या मोबाईची पाच इंच स्क्रीन असून हा डय़ूल सीमचा हा मोबाईल आहे. दोन जीबी रॅम आणि १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा तर ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच १६ जीबी इंटरनल मेमरी असून १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या