खिशातील मोबाईलला लागली अचानक आग, तरुण जखमी

24

सामना ऑनलाईन । हैदराबाद

चीनच्या शाओमी मोबाईल कंपनीविरोधात अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. कंपनीचा ‘रेडमी नोट-४’ मोबाईल लवकर गरम होतो ही एक महत्त्वाची समस्या आहे. अशातच बेंगळूरू पाठोपाठ आंध्र प्रदेशमध्ये खिशात स्मार्टफोनला आग लागल्यामुळे तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शाओमी कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

‘रेडमी नोट-४’ वापरणारा भावना सूर्यकिरण याने खिशात मोबाईलला आग लागल्याची तक्रार केली आहे. जखमी युवक आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातीलर रवुलापलेम गावचा रहिवासी आहे. बाईक चालवत असताना मोबाईलला आग लागल्यामुळे तरुणाच्या मांडीला दुखापत झाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे सूर्यकिरणने २० दिवसांपूर्वी मोबाईलची खरेदी केली होती. सूर्यकिरणने शाओमी कंपीनीविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शाओमी कंपनीशी संपर्क साधला असता प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे उत्तर देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या