108 मेगापिक्सचा कॅमेरा आणि 8 GB चा रॅम, Xiomi च्या i10 मोबाईलची किंमत आहे…

Xiomi चा i10 हा मोबाईल जानेवारीमध्ये लॉन्च झाला होता. सध्या Xiomi आणि Amazon वर एक्सचेंज ऑफर सुरू आहे. तसेच या फोनवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंटही आहे. या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच 8GBचा रॅम असून इंटर्नल मेमरीही 128 GBमध्ये उपलब्ध आहे.

Xiomi च्या फोनमध्ये क्वालाकॉम स्नॅपड्रॅगन 750 जीचा प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 5 G असून ड्युअल स्टीरीयो स्पीकर्सचाही समावेश आहे. फोनमध्ये 4820mAh ची बॅटरी आहे.

या फोनची खासियत म्हणजे फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल, 2 मेगापिक्सलचा मायक्रो आणि डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगासाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiomi च्या Mi 10i मध्ये रॅम आणि इंटर्नल मेमरीमध्ये ग्राहकांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. त्यात 6 GB 128 GB इंटर्नल मेमरी असलेल्या फोनची किंमत 21 हजार 999 इतकी आहे. तर 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल मेमरी असलेल्या फोनची किंमत 23 हजार 999 इतकी आहे. तसेच एसबीआय क्रेडिट धारकांसाठी आणखी दीड हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. तुम्ही जर तुमचा जुना फोन देऊन हा फोन विकत घेतल्यास 15 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या