आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी संघाचा नेपाळच्या संघाशी सामना होत असून या सामन्यात सलामीवीर यशस्वी जायस्वाल याने अवघ्या 48 चेंडूत 100 धावा चोपून काढल्या आहेत. शतक होताच यशस्वी जायस्वालचा बळी टीपण्यात नेपाळच्या गोलंदाजांना यश आले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा हिंदुस्थानी संघाच्या 16 षटकांत 150 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेसाठीचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडे असून त्याने या सामन्यात 23 चेंडूत 25 धावा केल्या. तिलक वर्मा या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. 10 चेंडू खेळत त्याने अवघ्या 2 धावा केल्या. जितेश वर्मा हा देखील 5 धावाच करू शकला.