राज्यातील अंगणवाडी सेविकांचा यथोचित सन्मान करणार; यशोमती ठाकूर यांची ग्वाही

राज्यभरात अंगणवाडी सेविकांनी कोविड कालावधीत अतिशय कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. त्या कोविड योद्धा आहेत, त्यांचा योग्य सन्मान करण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहन देणारे उपक्रम महिला व बाल विकास विभागाकडून राबवण्यात येतील अशी घोषणा या विभागाच्या मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केली.

युनीसेफच्या राजलक्ष्मी नायर व अल्पा व्होरा यांनी अॅड. यशोमती ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बालके, किशोरवयीन मुली, अंगणवाडी ताई यांच्याकरिता भविष्यात करता येणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा झाली. बालविवाह ही चिंतेची बाब आहे. बालविवाहांना आळा घालण्यासाठी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रबोधन आणि इतर उपाययोजनांच्या अनुषंगाने लवकरच बैठक घेण्यात येईल. 18 व्या वर्षी अनाथागृहातून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या भविष्याकरिता ठोस कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य, आदिवासी विकास, शिक्षण, गृह अशा शासनाच्या विविध विभागांचा समन्वय साधत महिला व बालकांच्या विकासासाठी रोडमॅप युनिसेफकडून तयार करण्यात येईल असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या